आमच्या विषयी

सुस्वागतम

"आम्ही ३३ वर्षांपासून स्वादिष्ट जेवण बनवत आहोत "

इवलेसे रोप लाविलीये द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी

संत ज्ञानेश्वरांच्या या काव्य पंक्तीच्या थोडेसे जवळ जाण्याचा प्रयत्न आमच्या स्वाद केटरर्स ने केला आहे असे म्हणावयास हरकत नाही. घरापासून सुरूवात केलेला व्यवसाय महाराष्टा्तील अनेक शहरांतील सभा समारंभात आपली छाप पाडत रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे. स्वाद केटरस च्या वाढत्या पसाऱ्याकडे आपण पाहिले की ही गोष्ट तुमच्याही सहज लक्षात येईल.

प्रथम घरगुती स्वरूपात आम्ही अगदी छोट्या स्वरूपात दिवाळीचे फराळ उदा. लाडू, चिवडा, चकल्या इ. पदार्थ बनवून देत असू. फराळाबरोबरच इडली-चटणी, वडा-चटणी, सांबार, साबूदाणा खिचडी, पोहे, उप्पीट इत्यादी रोज लागणारे पदार्थ; पुरणाच्या पोळया, खव्याच्या पोळया अशा ऑर्डर्स मिळू लागल्या. लोकांकडूनही आवडल्याच्या पोच पावत्या मिळत गेल्या.

हळू-हळू लग्न, मुंज , बारसे, डोहाळजेवण, साखरपुडा या सारख्या समारंभाना स्वाद केटरर्सने सुरूवात केली. लोकांच्या आवडीप्रमाणे कोणतेही पदार्थ बनवणे हा आमचा छंदच बनला. ५० व्यक्तींपासून ते ५००० माणसांचे जेवण शिस्तबध्द पध्दतीने देणे ही आमची खासीयत बनून गेली.

सातारा, नाशिक, औरंगाबाद, नगर इ. अनेक जिल्ह्यात तसेच पुणे जिल्ह्यातील भिगवण, चाकण, मंचर, उरळीकांचन अशा सर्वच गावांमध्ये स्वाद केटरर्सने आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

घरापासून सुरू या केलेल्या व्यवसायाला २४ वर्षे पूर्ण होत आहेत आणि आज स्वाद केटरर्स रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. हा स्वप्नपूर्तीचा आनंद स्वाद केटरर्सच्या सर्वच सभासदांना होत आहे. आजपर्यंतची ही झेप ही आपण दाखविलेल्या विश्वासात आहे.

आपण आम्हला सेवेची संधी दिलीत तशीच पुढेही मिळत राहो ही आपणासारख्या चोखंदळ रसिक खवय्यांना नम्र प्रार्थना. आपल्यासारख्या रसिक खवय्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेत म्हणूनच…